Use APKPure App
Get पांडुरंग विठ्ठल : विठ्ठल भक्ति old version APK for Android
विठ्ठल संत अभंग हरिपाठ ज्ञानेश्वरी तुकाराम गाथा भक्तिगीते अमृतानुभव हरी कृष्ण
।। जय हरी विठ्ठल ।।
।। विठ्ठल ।। विठ्ठल ।। विठ्ठल ।।
पांडुरंग विठ्ठल अँड्रॉइड ऍप्लिकेशन हे विठ्ठलाशी संबंधित विविध विषयाबद्दल माहिती देणारे एक उत्तम ऍप्लिकेशन आहे. यामध्ये पंढरपूर, विठ्ठल, अभंग, संत
परंपरा, ज्ञानेश्वरी (भावार्थ दीपिका) , गाथा, हरिपाठ, विठ्ठल आरती, संतांच्या आरत्या, अमृतानुभव, चांगदेव पासष्ठी, भक्तीगीते आणि इतर अनेक साहित्याबद्दल माहिती उपलब्ध आहे.
विठ्ठल उर्फ विठोबा, पांडुरंग हा विष्णुचा (कृष्णाचा) अवतार आहे.
विठ्ठलाची (विठोबा, पांडुरंग ) मुख्यतः महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, आंध्रप्रदेश, तेलंगणा आणि तामिळनाडू या राज्यात पूजा केली जाते.
महाराष्ट्रातील वारकरी संप्रदाय आणि कर्नाटकातील हरिदास संप्रदाय हे विठ्ठलाची पूजा मनोभावे करतात. या संप्रदायामध्ये कित्येक संत होऊन गेलेत ज्यांनी विठ्ठलाची मनोभावे पूजा केली आणि त्यावर अनेक अभंगाची रचना केली.
आधी रचली पांढरी मग वैकुंठ नागरी ।
जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर ।।
अशा शब्दात संत नामदेवांनी पंढरपूरचा गोडवा गायला आहे.
पांडुरंग विठ्ठल अँड्रॉइड अँप मध्ये वेगवेगळ्या संताबद्दलची माहिती, त्यांचे फोटो, अभंगरचना यांचा समावेश केलेला आहे.
संत नामदेव महाराज,
संत तुकाराम महाराज,
संत ज्ञानेश्वर महाराज,
संत एकनाथ महाराज,
संत चोखामेळा महाराज,
संत जनाबाई
या संतांच्या बद्दलची माहिती पांडुरंग विठ्ठल ऍप मध्ये आहे.
अनेक लोकांना महाराष्ट्रातल्या या संस्कृतीबद्दल जाणून घ्यायचे असते आणि विविध अभंगाचा आस्वाद घ्यायचा असतो पण हल्लीच्या धकाधकीच्या जीवनात पुरेशी माहिती उपलब्ध नसल्याने तसेच ही माहिती इतरत्र विखुरलेली असल्यामुळे थोडे कठीण जाते.
पांडुरंग विठ्ठल अँड्रॉइड ऍप ही सर्व माहिती एकत्र एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यास मदत करते. यामध्ये पंढरपूर, पांडुरंग म्हणजेच विठ्ठल मंदिर, विठ्ठलाविषयी माहिती, विठ्ठल अभंग, विठ्ठल फोटो, संत नामदेव अभंग, त्यांची माहिती, संत ज्ञानेश्वर हरिपाठ , अमृतानुभव , चांदेव पासष्ठी, संत ज्ञानेश्वरांनी परमेश्वराकडे मागितलेला प्रसाद म्हणजेच पसायदान, संत तुकाराम माहिती, तुकाराम गाथा, संत तुकारामांचे अभंग, संत एकनाथांचे अभंग आणि इतर अनेक संतांचे अभंग एकाच ठिकाणी उपलब्ध करून दिलेले आहेत.
पांडुरंग विठ्ठल ऍप मध्ये दररोज एक अभंग पाठवला जात असतो, दिवसाची सुरुवात छान आणि ज्ञानवर्धक अशा अभंगाने होण्यापलीकडे असे सुख कोणते.
हा अभंग ऍप मधेच साठवून ठेवता येतो आणि नंतर मित्र मंडळी आणि नातलगांसोबत शेअर ही करता येतो.
हरिपाठ हा १२व्या शतकातील संत ज्ञानेश्वरांनी लिहीलेल्या २८ अभंगाचा संग्रह आहे. हरिपाठाचे अभंग वारकरी संप्रदायातील भक्त विठ्ठलाच्या भक्तिभावात रोज सकाळी म्हणतात. हरिपाठ आणि पसायदानाला ज्ञानेश्वरीचा सार असेही समजले जाते.
पंचरत्न हरिपाठ चा समावेश करण्यात आला आहे.
संत ज्ञानेश्वर महाराज हरिपाठ
संत नामदेव महाराज हरिपाठ
संत तुकाराम महाराज हरिपाठ
संत निवृत्तीनाथ महाराज हरिपाठ
संत एकनाथ महाराज हरिपाठ
पांडुरंग विठ्ठल अँड्रॉइड ऍप मध्ये असलेल्या गुगल मॅप च्या मदतीने आपल्या आजुबाजूला असलेली विठ्ठलाची मंदिरे आणि इतर अनेक हिंदूंची मंदिरे ऍप मधूनच शोधता येतात .
पांडुरंग विठ्ठल ऍप मध्ये ज्ञानेश्वरी लिखीत स्वरूपात उपलब्ध आहे त्याचसोबत ज्ञानेश्वरीच्या मराठी अनुवादाचा विडिओ देखील आहे. मराठी ज्ञानेश्वरीचे सर्व १८ अध्याय आपणास एकाच ठिकाणी उपलब्ध करुन देण्यात आलेले आहेत. त्याचसोबत पसायदान, हरिपाठ आणि विठ्ठलाच्या भक्तिगीतांच्या विडिओ चा समावेश देखील केलेला आहे.
पांडुरंग विठ्ठल ऍप मध्ये आरती चे विशेष असे दालन असून यामध्ये आपणास विठ्ठलाची आरती, गणपतीची आरती, शंकराची आरती, देवीची आरती, दत्ताची आरती तसेच संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत नामदेव आणि संत एकनाथांच्या आरतीचा समावेश केलेला आहे. तसेच "घालीन लोटांगण" या भजनाचा समावेश देखील केलेला आहे.
पांडुरंग विठ्ठल अँड्रॉइड ऍप मध्ये पुढील भजनाचे आणि भक्तिगीतांचे व्हिडिओ आहेत,
१. नको देवराया ....
२. फिरत्या चाकावरती .....
३. जय जय राम कृष्ण हरी ....
४. तुझे रूप चित्ती राहो ....
५. विठु माउली तु ....
६. कानडा राजा पंढरीचा ....
७. सुंदरते ध्यान ....
८. वृक्ष वल्ली आम्हा सोयरे ....
९. अगा करुणाकरा ....
१०. खेळ मांडियेला ....
या आणि यासारख्या इतर अनेक भक्ती गीतांचा समावेश केलेला आहे.
।। जय हरी विठ्ठल ।।
।। विठ्ठल ।। विठ्ठल ।। विठ्ठल ।।
Last updated on Feb 16, 2020
New feature added to create graffiti of daily used messages and selected abhang.
Bug fixes.
UI Improvement.
द्वारा डाली गई
Angel Barrantes
Android ज़रूरी है
Android 5.0+
श्रेणी
रिपोर्ट
पांडुरंग विठ्ठल : विठ्ठल भक्ति
3.5 by PolsTech.com
Feb 16, 2020